( विल्यम वॉर्ड :-एक आवेशपूर्ण मिशनरी )

Keywords : --


Abstract

प्रस्तावना:-
भारतीय भूमीत अनेक मिशनऱ्यानी आपले पाय रोवले.त्यात विल्यम वॉर्ड यांचे कार्य महत्वपूर्ण आहे.विल्यम केरीचे ते सहकारी होते.मिशनरी चळवळीचा कर्ता सोबत आपले मिशनरी कार्य सुरु करणे हे विल्यम वॉर्डचे भाग्यच म्हणावे लागेल तरी त्यांनी आपल्या अभूतपूर्ण विचारांनी भारतीय धर्म आणि संस्कृती एक वेगळे स्थान प्राप्त केले. विल्यम वॉर्डने Account आणि History of the Hindoos या ग्रंथाच्या माध्यमातून हिंदूधर्मतत्वावर आपले सर्वोत्तम विचार मांडले.त्याचे हे कार्य भारतात जाणाऱ्या नवीन मिशनरींसाठी ज्ञानाचा खजिना होता.कारण इंग्लंडमध्ये आणि इतर युरोपियन ख्रिस्ती देशात अशी प्रथा होती कि ज्या देशात मिशनरी पाठवायचा असेल त्याअगोदर त्या मिशनरीला त्या देशातील धर्म,संस्कृती,आणि विचार जाणून आणि समजून घेणे फारच अगत्याचे होते. विल्यम वॉर्ड यांचे मिशनरी चळवळीतील योगदान आणि विचार हे जागतिक मिशनरी चळवळीवर परिणाम करणारे झाले.विल्यम केरी नंतर भारतीय धर्म आणि संस्कृतीवर सर्वोत्तम भाष्यमाला लिहिणारे ते सर्वोत्कृष्ट आणि प्रामणिक मिशनरी होते.

Download



Comments
No have any comment !
Leave a Comment