‘’इतिहासातील फ्रॉडेंज-म्हणजे गोफणगुंडे:- एक इतिहासाची उजळणी’’

Keywords : --


Abstract

प्रस्तावना:-
जगात भरपूर युद्धे झाली पण प्रत्येक युद्धात चिन्हांचा वापर करण्यात आला ,१६४८ मध्ये झालेल्या फ्रेंच राजमुकुटाच्या बंडातही या चिन्हांचा वापर केला गेला. *रॉबर्ट ग्रीन लिहितात* _"फ्रेंच राजमुकुटाच्या विरोधातील बंडाच्या वेळी राजाशी इमान ठेवणाऱ्यांनी या पुडाई करणाऱ्या लोकांची निर्भत्सना केली.त्यांना अत्यंत तुच्छतेने पाहिले.मोठ्या मुलांना घाबरवण्यासाठी लहान मुले गोफणगुंडे वापरतात-त्या उठवळ गोफणगुंड्याची उपमा ( *फ्रॉडेंज* -फ़्रेंचमधील शब्द) राजाच्या पक्षातील लोकांना बंडखोरास दिली.प्रतिकात्मक चिन्हांसारखा या तुच्छतापूर्ण संज्ञेचा वापर करायचा निर्णय कार्डिनल रेझनने घेतला.या उठावाचे नाव आता *फ्रॉडे* असे पडले आणि उठावकर्त्यांना *फ्रॉडेंअर* या नावाने संबोधण्यात येऊ लागले.गोफणगुंड्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या *हॅटमध्ये* ते टिकरीसारखी चौकट खोचू लागले. *गोफणगुंडा* हा शब्द एकत्र जमण्याचा,एकाच उद्दिष्टांच्या छत्राखाली एकत्र येण्याचा संकेत बनला.या साऱ्याशिवाय बंडखोर विखुरले असते.उठवाचा दारूण शेवट झाला असता.

Download



Comments
No have any comment !
Leave a Comment