''चर्चचे स्थापत्यशिल्प आणि त्याचे बदलते स्वरूप ''
- Author वळवी विश्वास गोरखनाथ
- DOI
- Country : India
- Subject : इतिहास
प्रस्तावना:-
जागतिक इतिहासात ख्रिस्ती धर्माच्या उदयाबरोबर अनेक बदल भौतिक आणि दृष्य जगात घडून आले.आणि चर्च हे त्याच्या केंद्रस्थानी होते.मिशनरी चळवळीच्या प्रवाहात स्थानिक मंडळीच्या स्थापत्यशिल्पात अनेक बदल झाले.आज सेंट पीटर्सबर्ग चर्च,होली सेपलकर चर्च,ओल्ड गोव्यातील अनेक चर्च तसेच भारतात गाव तेथे मंडळी या उक्तीप्रमाणे आज अनेक खेड्यापाड्यात स्थानिक चर्चच्या एक न थांबणारा प्रवाहाच गेल्या दोनशे वर्षापासून सुरु आहे.संशोधकाने चर्चचे स्थापत्यशिल्प या शीर्षकाखाली ख्रिस्ती धर्मात चर्चचे वेगवेगळे स्थापत्यशिल्पाचे प्रवाह आणि पद्धती कशी बदलत गेली याचा उहापोह केलेला आहे.चर्च हे सगळ्या समाजाला माहित असले तरी त्याचे प्रकार आणि महत्व अनेक लोकांना माहित नाही.त्यामुळे ते अज्ञान दूर व्हावे आणि चर्चचे स्थापत्यशिल्प नेमके काय? या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळावे हेच संशोधनाचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.आज चर्चचा विकास हा,सिनेगोज,Church (मंडळी) Local Church (स्थानिक मंडळी),बेसलिका किवा कथीड्रल इत्यादी इमारतीत मार्फत अनेक भित्तीचित्रे,हस्तलिखिते,हस्तिदंत कोरीवकाम,यांच्या माध्यमातून काळानुसार बदलत गेला.चर्चचे स्थापत्य हे संपूर्ण युरोपावर कोरलेले असून पवित्रशास्त्र आणि ख्रिस्त येशू हे त्यांचे मुख्य विषय आहे.भारतातही चर्चची संख्या हि मोठ्याप्रमाणात आहे.
Comments
No have any comment !